महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

Thailand mass shooting : थायलंडमध्ये मुलांच्या डे केअर सेंटरमध्ये गोळीबार ; किमान 31 लोक ठार - थायलंडमध्ये गोळीबार

Thailand mass shooting : थायलंडच्या ईशान्येकडील प्रांतातील मुलांच्या डे-केअर सेंटरमध्ये गोळीबारात ( Shoot in Thailand ) किमान 31 लोक ठार (At least killed 31 ) झालेत.देशातील नॉन्ग बुआ लम्फू प्रांतातील ना क्लांग जिल्ह्यात झालेल्या गोळीबारात अनेक मुले आणि प्रौढांचा मृत्यू झाला. रॉयटर्सने पोलिस प्रवक्त्याचा हवाला देऊन हे वृत्त दिले आहे.

Shoot in Thailand
थायलंडच्या ईशान्येकडील प्रांतातील मुलांच्या डे-केअर सेंटरमध्ये गोळीबार

By

Published : Oct 6, 2022, 1:50 PM IST

Updated : Oct 6, 2022, 3:53 PM IST

बँकॉक - Thailand mass shooting : थायलंडच्या ईशान्येकडील प्रांतातील मुलांच्या डे-केअर सेंटरमध्ये गोळीबारात( Shoot in Thailand ) किमान 31 लोक ठार ( At least killed 31 ) झालेत.देशातील नॉन्ग बुआ लम्फू प्रांतातील ना क्लांग जिल्ह्यात झालेल्या गोळीबारात अनेक मुले आणि प्रौढांचा मृत्यू झाला. रॉयटर्सने पोलिस प्रवक्त्याचा हवाला देऊन हे वृत्त दिले आहे.

बंदूकधारी हा माजी पोलीस अधिकारी होता( Formar police officer ) आणि त्याचा शोध सुरू आहे. घटनास्थळावरून पळून गेलेल्या संशयिताने स्वत:वर गोळी झाडून घेतल्याची माहिती आहे, असे पोलीसांनी सांगितले.

थायलंडच्या केंद्रीय अन्वेषण पोलिसांनी (सीआयपी) फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, मुलाच्या केंद्रावर झालेल्या गोळीबार करणारा हल्लेखोर पान्या खमराब, 34,उथाई सावन उपजिल्हा, ना क्लांग जिल्हा, नॉन्ग बुआ लम्फू प्रांत मध्ये त्य़ाचा पाठपुरावा सुरू आहे. गुन्हेगाराने वापरलेले वाहन हे पांढऱया रंगांची टोयोटा विगो पिकअप ट्रक आहे.त्या वाहनाची परवाना प्लेट नोंदणी 6. कोर 6499, बँकॉक असा आहे.

घटनास्थळावरून पळून गेलेल्या संशयिताने स्वत:वर गोळी झाडून घेतल्याची माहिती आहे.पन्याला 2021 मध्ये ड्रग चाचणीत अपयशी (Failed in drug test ) ठरल्याबद्दल पोलीस दलातील त्याच्या पदावरून काढून टाकण्यात आले, असे एका स्थानिक प्रकाशनाने सांगितले.

Last Updated : Oct 6, 2022, 3:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details