महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

Pakistan PM : अन्वर उल हक काकर पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान, शहबाज शरीफ यांच्या राजीनाम्यानंतर निर्णय

बलुचिस्तान अवामी पक्षाचे नेते अन्वर उल हक काकर यांची पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली आहे. ते वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपर्यंत काळजीवाहू सरकारचे नेतृत्व करतील.

Anwar ul Haq Kakar
अन्वर उल हक काकर

By

Published : Aug 12, 2023, 8:00 PM IST

इस्लामाबाद : आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानात येत्या काही महिन्यात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी शनिवारी काळजीवाहू पंतप्रधानांच्या नावाची घोषणा करण्यात आली. सिनेटर अन्वर उल हक काकर यांची पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली आहे.

वर्षाच्या अखेरपर्यंत काळजीवाहू सरकारचे नेतृत्व करतील : निवर्तमान पंतप्रधान शहबाज शरीफ आणि विरोधी पक्षनेते राजा रियाझ यांनी दोन फेऱ्यांच्या चर्चेनंतर काकर यांचे नाव निश्चित केले. बलुचिस्तान अवामी पार्टीचे (बीएपी) नेते काकर या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या निवडणुकांपर्यंत पाकिस्तानातील काळजीवाहू सरकारचे नेतृत्व करतील.

९० दिवसांत सार्वत्रिक निवडणूक होणे आवश्यक : पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी मुदतीच्या तीन दिवस आधी ९ ऑगस्ट रोजीच नॅशनल असेंब्ली विसर्जित करण्याची शिफारस केली होती. यामुळे घटनेनुसार पुढील सार्वत्रिक निवडणूक ९० दिवसांत होणे आवश्यक आहे. मात्र निवडणुकीला काही महिने उशीर होण्याची अपेक्षा आहे. कारण नवीन जनगणनेचे निकाल सध्याच्या सरकारने मंजूर केले आहेत. निवडणुकीपूर्वी त्यांचे परिसीमन करणे हे घटनात्मकदृष्ट्या बंधनकारक आहे.

पाकिस्तानची घटना काय सांगते : शरीफ यांनी शुक्रवारी इस्लामाबादमध्ये पत्रकारांना सांगितले होते की, ते आणि रियाझ शनिवारपर्यंत या पदासाठी नेत्याचे नाव निश्चित करतील. तसेच या चर्चेत माजी आघाडीच्या पक्षांनाही सामील केले जाईल. मात्र कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी युतीच्या भागीदारांना विश्वासात घेतले जाईल, असे ते म्हणाले होते. पाकिस्तानचे राष्ट्रपती अल्वी यांनी शरीफ आणि रियाझ यांना पत्र लिहून शनिवारपर्यंत नाव निश्चित करण्यास सांगितले होते. पाकिस्तानच्या घटनेनुसार, राष्ट्रपती निवर्तमान पंतप्रधान आणि नॅशनल असेंब्लीमधील विरोधी पक्षाच्या नेत्याशी सल्लामसलत करून काळजीवाहू पंतप्रधानाची नियुक्ती करतात.

काकर प्रदीर्घ काळापासून राजकारणात आहेत : जाणकारांनुसार, सिनेटर अन्वर उल हक काकर हे पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान बनणे जवळपास निश्चित होते. ते बलुचिस्तान अवामी पक्षाचे नेते आहेत. ते प्रदीर्घ काळापासून राजकारणात आहेत. त्यांचे कुटुंब पश्तून आदिवासी आहे. विशेष म्हणजे, बलुच आणि पश्तून या दोघांवरही त्यांची चांगली पकड आहे.

हेही वाचा :

  1. Imran Khan : इम्रान खान यांना तीन वर्षांचा कारावास, लाहोरमधून अटक, ५ वर्ष निवडणूकही नाही लढता येणार
  2. US President Race : अमेरिकेच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाची व्यक्ती बसण्याची शक्यता वाढली; चौथा भारतीय वंशाचा उमेदवार शर्यतीत
  3. US President Race : अमेरिकेत भारतीयांचा दबदबा, अध्यक्षपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचा तिसरा उमेदवार उतरला

ABOUT THE AUTHOR

...view details