न्यूयॉर्क : मीडिया टायकून रुपर्ट मर्डोक यांनी सोमवारी जाहीर केले की, ते वयाच्या 92 व्या वर्षी पाचव्यांदा लग्न करणार आहेत. या अब्जाधीश उद्योगपतीने 66 वर्षीय माजी पोलीस महिला अॅन लेस्ली स्मिथ यांच्याशी आपल्या साखरपुड्याची घोषणा केली आहे. सप्टेंबरमध्ये कॅलिफोर्नियातील एका कार्यक्रमात या दोघांची भेट झाली होती. मर्डोक यांनी सांगितले की, त्यांनी स्मिथला 'सेंट पॅट्रिक डे' च्या दिवशी प्रपोज केले. मर्डोक यांनी यावेळी सांगितले की, 'मला आता प्रेमाची भीती वाटत होती, पण मला माहित आहे की हे माझे शेवटचे प्रेम आहे. हे चांगले राहिल अशी माझी अपेक्षा आहे. मी आनंदी आहे.'
उन्हाळ्यात होणार लग्न : गेल्या वर्षी ते त्यांची चौथी पत्नी जेरी हॉलपासून वेगळे झाले होते. उन्हाळ्यात त्यांचे लग्न होणार आहे. मर्डोक यांनी यापूर्वी ऑस्ट्रेलियन फ्लाइट अटेंडंट पॅट्रिशिया बुकर, स्कॉटिश वंशाच्या पत्रकार अण्णा मान आणि चिनी वंशाच्या उद्योजक वेंडी डेंग यांच्याशी लग्न केले होते. तर स्मिथ यांचे दिवंगत पती चेस्टर स्मिथ हे गायक आणि रेडिओ व टीव्ही एक्झिक्युटिव्ह होते. त्यांनी वृत्तपत्राला सांगितले की, 'आम्हा दोघांसाठी ही दैवी देणगी आहे. आम्ही गेल्या सप्टेंबरमध्ये भेटलो. मी १४ वर्षांची विधवा आहे. रुपर्टप्रमाणेच माझे पतीही व्यापारी होते. म्हणूनच मी रुपर्टशी कनेक्ट झाले. आमचे बरेच मते समान आहेत.