वॉशिंग्टन/नवी दिल्ली- अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात अल-कायदाचा दहशतवादी अयमान अल-जवाहरी ( Al Qaeda leader Ayman ) ठार झाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी या कारवाईला पुष्टी ( CIA drone strike in Afghanistan ) दिली आहे. बायडेन यांनी व्हाईट हाऊसमध्ये अल-जवाहिरी ठार झाल्याची औपचारिक घोषणा केली. 2011 मध्ये ओसामा बिन लादेनला पाकिस्तानातील अबोटाबाद येथे अमेरिकेच्या नेव्ही सीलने ठार केले होते. त्यानंतर मूळ इजिप्तचा अल-जवाहरी हा अल कायदाचा प्रमुख झाला होता.
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन ( USA president on Al Qaeda leade ) म्हणाले, की तो पुन्हा कधीही, पुन्हा कधीही, अफगाणिस्तानला दहशतवाद्यांचे सुरक्षित आश्रयस्थान बनू देणार नाही. कारण तो गेला आहे. आम्ही हे सुनिश्चित करणार आहोत की दुसरे काहीही होणार नाही. हा दहशतवादी नेता राहिलेला नाही. अमेरिकेच्या गुप्तचर अधिकाऱ्यांनी अल-जवाहरीचा काबूलच्या मध्यभागी असलेल्या एका घरी शोध घेतला. तिथे तो त्याच्या कुटुंबासह लपला होता. राष्ट्रपतींनी गेल्या आठवड्यात या ऑपरेशनला मंजुरी दिली. त्यानंतर रविवारी मोहिम पार पडली.
भारतात दिली होती चिथावणी-अल-कायदाचा प्रमुख अयमान अल जवाहिरी ( Al Qaeda chief Ayman Al Zawahiri ) याने भारतात सध्या सुरू असलेल्या हिजाबच्या वादावर भूमिका मांडली आहे. त्याने कर्नाटकातील विद्यार्थिनी मुस्कान खानचा उल्लेख केला होता. मुस्कानने हिजाबचे समर्थन करत ८ फेब्रुवारी रोजी 'अल्लाहू अकबर'चा नारा दिला होता. तर दुसरीकडे उजव्या विचारसरणीच्या जमावाने 'जय श्री राम'च्या घोषणा दिल्या होत्या. या मुस्काने अल जवाहिरीने कौतुक केले होते.