टेक्सास:अमेरिकेतील टेक्सासच्या डॅलास येथे एअर शो दरम्यान दुर्घटना ( Accident During Air Show In Dallas ) घडली. बी-17 हेवी बॉम्बर दुसर्या विमानाला धडकले. त्यामुळे दोन्ही विमान क्रॅश झाले. या दुर्धटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत ( Probability Death Of Six People ) आहे. ही घटना अमेरिकेत दुसऱ्या महायुद्धाच्या प्रीमियर एअर शो दरम्यान घडली. या दुर्घटनेच दोन्ही विमानांचे मोठे नुकसान झाले.
सहा जणांच्या मृत्यूची शक्यता :शनिवारी अमेरिकेतील डलास येथे एका एअर शोदरम्यान हवेत उडणाऱ्या बोईंग बी-17 बॉम्बरची एका छोट्या विमानाशी टक्कर झाली. टेक्सास राज्यातील डॅलास येथे विमानतळावर हा एअर शो आयोजित करण्यात आला होता. विमान जमिनीवर पडताच त्याला आग लागली. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दोन्ही विमानांचे अक्षरश: तुकडे :यूएस फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (एफएए) ने दोन्ही विमानांच्या वैमानिकांबद्दल तसेच त्यांच्या स्थितीबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक मोठे बी-17 विमान कमी उंचीवर उडताना दिसत आहे. त्याच वेळी, एक लहान बेल P-63 किंगकोब्रा विमान डावीकडून वेग घेते आणि B-17 विमानाला धडकते. यात दोन्ही विमानांचे अक्षरश: तुकडे होतात.
राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळाकडून चौकशी: विमान जमिनीवर पडल्यानंतर त्याला आग लागली. बी-17 हे दुसऱ्या महायुद्धातील विमान ( B17 World War Aircraft ) होते. याचा वापर जोरदार बॉम्बस्फोट करण्यासाठी केला जात ( Bombblast Aircraft B17 ) होता. अपघाताची FAA आणि राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळाकडून चौकशी केली जात ( National Traffic Safety Board Inquiry 0-आहे. डॅलासचे महापौर एरिक जॉन्सन यांचेही या दुर्घटनेवर वक्तव्य आले आहे. ते म्हणाले की, शहरात एअर शो दरम्यान एक भयानक दुर्घटना घडली. यावेळी अपघाताशी संबंधित अनेक अज्ञात आणि पुष्टी नसलेले तपशील आहेत. नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड आणि डॅलस पोलीस विभाग अपघातस्थळी अपघाताचा तपास करत आहेत. डॅलास फायर-रेस्क्यूने देखील मदत केली आहे.