महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

अफगाणिस्तानचा भारतातील दूतावास कायमस्वरूपी बंद, निवेदन जारी करून 'ही' माहिती दिली - अफगाण दूतावास

Afghanistan Embassy : अफगाणिस्तानचा भारतातील दूतावास कायमस्वरूपी बंद करण्यात आला आहे. भारत सरकारकडून मिळत असलेल्या सततच्या आव्हानांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं दूतावासानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं.

Afghanistan Embassy
Afghanistan Embassy

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 24, 2023, 5:27 PM IST

नवी दिल्ली Afghanistan Embassy : अफगाणिस्ताननं नवी दिल्लीतील आपला दूतावास कायमस्वरूपी बंद करण्याची घोषणा केली आहे. दूतावासानं अधिकृत निवेदन जारी करत ही माहिती दिली.

अफगाण दूतावासाचं निवेदन : अफगाण दूतावासानं निवेदनात म्हटलं आहे की, "भारत सरकारकडून मिळत असलेल्या सततच्या आव्हानांमुळे हा निर्णय घेण्यात आला. २३ नोव्हेंबर २०२३ पासून तो लागू होईल. ३० सप्टेंबर रोजी दूतावासानं कामकाज बंद करण्याच्या निर्णयानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे". अफगाण दूतावासानं पुढे म्हटलं की, 'हा निर्णय धोरण आणि हितसंबंधांच्या व्यापक तफावतीचा परिणाम आहे. "आम्ही भारतातील आमच्या मिशनच्या कार्यकाळात अफगाण नागरिकांना समजून घेतल्याबद्दल आणि पाठिंबा दिल्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो. मर्यादित संसाधनं आणि शक्ती तसेच काबूलमध्ये कायदेशीर सरकार नसतानाही भारतातील आमच्या नागरिकांच्या भल्यासाठी अथक प्रयत्न केले", असं त्यांनी नमूद केलं.

अफगाणिस्तानचा एकही राजदूत भारतात नाही : निवेदनात पुढे म्हटलं आहे की, आता अफगाणिस्तानचा एकही राजदूत भारतात नाही. ज्या राजदूतांनी इस्लामिक रिपब्लिक ऑफ अफगाणिस्तानच्या दूतावासात सेवा दिली, ते सुरक्षितपणे इतर देशांमध्ये पोहोचले आहेत. जर कोणी असा दावा करत असेल तर त्याला इस्लामिक रिपब्लिक ऑफ अफगाणिस्तानचा प्रतिनिधी मानू नये. आता भारतात केवळ तालिबानशी संबंधित राजदूत उपस्थित आहेत.

तज्ज्ञांचं मत : या घडामोडीवर 'ईटीव्ही भारत'नं तज्ज्ञांशी संवाद साधला. अमेरिकेतील माजी भारतीय राजदूत मीरा शंकर म्हणाल्या, 'दिल्लीतील अफगाणिस्तान दूतावास बंद झाल्यानंतर यातून अफगाणिस्तानची अंतर्गत विभागणी दिसून येते, कारण दूतावास तालिबान सत्तेत येण्यापूर्वीच सुरू होता. बहुतांश आंतरराष्ट्रीय समुदायाप्रमाणे, भारतानंही तालिबान सरकारला महिला आणि अल्पसंख्याकांच्या वागणुकीच्या चिंतेमुळे मान्यता दिलेली नाही. परंतु अफगाणिस्तानच्या लोकांशी आपले परंपरेनं चांगले संबंध आहेत. आपण मानवतावादी आधारावर तालिबानच्या ताब्यानंतरही अफगाणिस्तानला अन्नाची मदत दिली, असं त्या म्हणाल्या.

हेही वाचा :

  1. भारत सरकारचा मोठा निर्णय, कॅनडाच्या नागरिकांसाठी ई-व्हिसा सेवा केली पूर्ववत

ABOUT THE AUTHOR

...view details