झेंगझो (चीन ) : चीनमध्ये बँक ऑफ चायनाच्या हेनान शाखेत मोठे आंदोलन सुरु झाले ( Zhengzhou Peoples Bank of China ) आहे. बँकेतील घोटाळ्याच्या विरोधात नागरिक मोठ्या संख्येने आंदोलन करत ( Henan bank protest ) असून, आंदोलकांना रोखण्यासाठी चीन सरकारने रस्त्यावर रणगाडे तैनात केले ( PLAs tanks in Henan streets ) आहेत. चायनीज पीपल्स लिबरेशन आर्मीचे रणगाडे (पीएलए) बँकांचे संरक्षण करण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचा दावा करणारे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे.
बँक ऑफ चायनाच्या हेनान शाखेत मोठा घोटाळा झाला असून, खातेदारांचे पैसे गोठवण्यात आले आहेत. बँकेतील रक्कम काढता येत नसल्याने आक्रोश निर्माण झाला आहे. यापूर्वीही चीनमध्ये असेच आंदोलन सरकारने चिरडून टाकले होते. 4 जून 1989 रोजी तियानमेन स्क्वेअर हत्याकांडाची ती भयंकर आठवण आहे. जेव्हा चिनी नेत्यांनी बीजिंगचा तियानमेन स्क्वेअर येथे आंदोलन थांबवण्यासाठी रणगाडे आणि जोरदार सशस्त्र सैन्य पाठवले होते. तेथे लोकशाही आणि अधिक स्वातंत्र्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आंदोलक आंदोलन करत होते. नि:शस्त्र आंदोलक हजारोंच्या संख्येने मारले गेले होते.