कीव -युक्रेनमधील रशियाच्या हल्लानंतर युक्रेनमधून जवळपास 45 लाख नागरिकांनी ( ( Migration From Ukraine To Romania ) ) स्थलांतर केले आहे. यापैकी 26 लाख लोकांचे ( Migration From Ukraine To Poland ) पोलंडमध्ये, तर 6 लाख 68 हजार नागरीक रोमानियात ( Migration From Ukraine To Romania ) गेल्याची माहिती आहे. रशियाच्या हल्लानंतर युक्रेनला पाठिंबा देण्यात अमेरिका महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी दिली आहे.
Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धाचा आजचा 47वा दिवस, युक्रेनमधून आतापर्यंत 45 लाख नागरिकांचे स्थलांतर - Russia Ukraine War migration number
रशिया युक्रेन युद्धाचा ( Russia Ukraine War ) आज 47वा दिवस आहे. यादम्यान युक्रेनमधून जवळपास 45 लाख ( Ukraine Citizen Migration ) नागरिकांनी स्थलांतर केले आहे. यापैकी 26 लाख लोकांचे पोलंडमध्ये ( Migration From Ukraine To Poland ) , तर 6 लाख 68 हजार नागरीक रोमानियात ( Migration From Ukraine To Romania ) गेल्याची माहिती आहे.
रशियाने युक्रेनचे शहर मारियुपोलवर रशियन सैन्याच्या गोळीबारानंतर लोकांना बाहेर पडणे कठीण झाले आहे. मात्र, मारियुपोलमध्ये किती लोक अडकले याची माहिती मिळू शकली नाही. युद्धापूर्वी या शहरात 4 लाख 30 हजार पेक्षा जास्त लोक राहत होते. मात्र, युद्धानंतर आता अनेकांनी येथून स्थलांतर केले आहे. सद्या मारियुपोलमध्ये सुमारे 1 लाख लोक अडकले आहेत. तर ब्रिटिश संरक्षण अधिकार्यांनी या शहरात 1 लाख 60 हजार लोक अडकल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मारियुपोलमध्ये रशियांच्या हल्ल्यानंतर युक्रेनियन सैन्याने आत्मसमर्पण करण्यास नकार दिला असून शहराचा बराचसा भाग नष्ट झाला आहे.