काबुल - अफगाणिस्तानमधील बडघीस प्रोविस या ठिकाणी अफगाणी सुरक्षा दलाच्या जवानांनी तालिबानी दहशतवाद्यांच्या ठिकठिकाणच्या तळावर हल्ले केले. त्यावेळी झालेल्या चकमकीत 32 तालिबानी दहशतवादी मारले गेले आहेत. तर 20 जण जखमी झाले असल्याची माहिती सोमवारी एका उच्च अधिकाऱ्याने दिली.
अफगाणिस्तान लष्कराने 32 तालिबानी दहशतवाद्यांना घातले कंठस्नान - अफगाणिस्तान मध्ये 32 तालिबानी ठार
वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार प्रोविंसयल कौन्सिलचे सदस्य मोहम्मद नसीर नजरी यांच्या मतेही चकमक मुकर जिल्ह्यातील संजादक परिसरात झाली. या चकमकीत सुरक्षा दलाचा एक जवान ही ठार झाला , तर 7 जवान जखमी झाले आहेत.
वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार प्रोविंसयल काऊन्सिलचे सदस्य मोहम्मद नसीर नजरी यांच्या मतेही चकमक मुकर जिल्ह्यातील संजादक परिसरात झाली. या चकमकीत सुरक्षा दलाचा एक जवान ठार झाला , तर 7 जवान जखमी झाले आहेत.
अफगानिस्तान लष्कराच्या माहितीनुसार, सुरक्षा दलाची तालिबानी दहशतवाद्यांविरोधात मोहीम चालूच राहील. तसेच त्यांना आम्ही बडघीस प्रोविंस मधून पिटाळून लावूनच शांत बसू. तेव्हाच तेथे शांतता प्रस्थापित होईल, असे म्हटले आहे. या हल्ल्याबाबत तालिबानकडून अद्याप कोणती माहिती समोर आली नाही.