बिजींग : गुरुवारी नैऋत्य चीनच्या चोंगकिंग येथील ( Southwest China's Chongqing ) विमानतळावर प्रवासी विमान टेकऑफच्या वेळी धावपट्टीवरून घसरल्याने 40 हून अधिक जखमी झाल्याची माहिती स्थानिक मिडीयाने दिली.
तिबेट एअरलाइन्सने (Tibet Airlines) च्या प्रवासी विमानात 122 प्रवासी आणि नऊ क्रू सदस्य होते. शिन्हुआ विमानतळाच्या सूत्रांचा हवाला देऊन अहवाल दिला. विमानातील सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेचे कारण अद्याप अज्ञात आहे.