वॉशिंग्टन : न्यूयॉर्कच्या सायराक्यूस भागात रविवारी पहाटे (स्थानिक वेळेनुसार) रस्त्यावर चालू असलेल्या पार्टीतील 13 जणांवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. पार्टीत सहभागी झालेल्या काहीं लोकांवर गोळ्या झाडण्यात आल्या तर काहींवर चाकू हल्ला करण्यात आला. तर काही जणांना कारने धडक देण्यात आली. याप्रकरणात पोलीस तपास सुरू झाला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. याविषयीचे वृत्त न्यूयॉर्क पोस्टने पोलीस आणि एका व्यक्तीचा हवाला देऊन दिले आहे.
गोळीबार आणि चाकू हल्ला : सायराक्यूस येथील पोलिसांचे प्रवक्ते लेफ्टनंट मॅथ्यू मालिनोव्स्की यांनी एका माध्यमांना सांगितले की, शहराच्या पश्चिमेकडील डेव्हिस स्ट्रीटच्या 100 ब्लॉकवर शेकडो लोक जमले होते. तेव्हा सकाळी 12:22 वाजता (स्थानिक वेळेनुसार) गोळीबाराचा आवाज ऐकू आला होता. पोलिसांनी या घटनेविषयी अतिरिक्त माहिती देताना सांगितले की, 4 जणांवर गोळ्या झाडल्या गेल्या, सहा जणांना चाकूने भोसकण्यात आले. तर इतर 3 जण जे या हल्ल्यापासून वाचून पळू जात होते त्यांना वाहनाने धडक दिली.
तीन जणांवर गोळीबार : दरम्यान ज्या लोकांवर त्यात 3 पुरुष आणि 10 महिलांचा समावेश आहे. मालिनोव्स्की यांनी सांगितले की, जखमी झालेल्या लोकांचे वय 17 ते 25 च्या दरम्यान आहे. दरम्यान हल्लात झालेले व्यक्ती धोक्यातून बाहेर आहेत. जखमींना परिसरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्या लोकांवर गोळ्या झाडण्यात आल्या यामध्ये 17 वर्षाची तरुणी, 20 वर्षीय महिला, 20 वर्षीय पुरुष आणि 22 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
अशी घडली घटना : न्यू यॉर्क पोस्टने Syracuse.com च्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, सोशल मीडियावर जाहिरात केलेल्या ब्लॉक पार्टीसाठी लोक जमले होते. आउटलेटशी बोलताना, एका शेजाऱ्याने सांगितले की, मध्यरात्रीच्या आधी भांडण झाले परंतु ते लवकर संपले, त्यानंतर सुमारे 20 मिनिटांनंतर आणखी एक हाणामारी झाली आणि डझनभर गोळ्या झाडल्या गेल्या. सायराक्यूस पोलीस स्टेशन प्रमुख पोलीस जो सेसिल यांनी सांगितले की, गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने अनेक ब्लॉकमध्ये गोळीबाराचा आवाज ऐकला. गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. या हल्ल्यात अनेक लोक जखमी होऊ नये याची दक्षता गस्तीवरील कर्मचाऱ्यांनी घेतली.
हेही वाचा -
- Texas Shooting : महासत्ता हादरली! मॉलबाहेरील गोळीबारात नऊ जणांचा मृत्यू, पोलिसांच्या गोळीबारात मारेकरी ठार
- smuggling puppies and cat : मलेशियातून मांजराची तस्करी केल्याप्रकरणी भारतीय वंशाच्या नागरिकाला शिक्षा