महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

'पत्रकार खशोग्गी यांची हत्या करण्यात सौदीच्या क्राऊन प्रिंन्सचा हात' - जमाल खशोग्गी हत्या प्रकरण

२ ऑक्टोबर २०१८ साली तुर्कस्तानातील इस्तांबूल शहरातील सौदी अरेबियाच्या दुतावासात खशोग्गी यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. सौदी अरेबियाच्या क्राऊन प्रिंन्सच्या हुकूमशाही विरोधात खशोग्गी लिखाण करत असत.

सौदी अरेबिया क्राऊन प्रिंन्स
सौदी अरेबिया क्राऊन प्रिंन्स

By

Published : Feb 27, 2021, 10:12 AM IST

वॉशिंग्टन - सुप्रसिद्ध अमेरिकेन पत्रकार जमाल खशोग्गी यांची हत्या करण्यामागे सौदी अरेबियाच्या क्राऊन प्रिंन्सचा हात असल्याची शक्यता अमेरिकेने व्यक्त केली आहे. अमेरिकेने शुक्रवारी इंटेलिजन्स खात्याचा अहवाल जाहीर केला. त्यात हा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. त्यामुळे खशोग्गी यांच्या हत्येस सौदी अरेबियाला जबाबदार धरण्याचा बायडेन प्रशासनावर दबाव निर्माण होत आहे. खशोग्गी यांच्या हत्येनंतर जगभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता.

सौदी राजघराण्यावर केली होती सडकून टीका -

२ ऑक्टोबर २०१८ साली तुर्कस्तानातील इस्तांबूल शहरातील सौदी अरेबियाच्या दुतावासात खशोग्गी यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. सौदी अरेबियाच्या क्राऊन प्रिंन्सच्या हुकूमशाही विरोधात खशोग्गी लिखाण करत असत. सौदी राजघरणाऱ्यावर त्यांनी आपल्या लेखनीतून सडकून टीका केली होती. सर्व सत्ता क्राऊन प्रिंन्सने आपल्या हातात घेतल्याचा आरोप खशोग्गी यांनी केला होता.

अमेरिका काय कारवाई करणार?

दरम्यान, या हत्या प्रकरणाचा तपास करण्यात आला असून यातून काहीही निष्पण्ण झाले नाही. सौदी अरेबियाच्या क्राऊन प्रिंन्सने ही हत्या केल्याची चर्चा होत आहे. मात्र, याबाबत सबळ पुरावे उपलब्ध होऊ शकले नाही. सौदी हा मध्यपूर्वेतील अमेरिकेचा राजकीय आणि रणनितीच्या दृष्टीने महत्त्वाचा भागीदार देश आहे. नवनिर्वाचित जो बायडेन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची सुत्रे नुकतीच हाती घेतली आहेत. त्यामुळे ते सौदी अरेबियाला या हत्येस जबाबदार धरतात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हत्या करण्यात आलेले पत्रकार जमाल खशोग्गीचा यांची तुर्की येथे राहणारी प्रेयसी हॅटिस सेनगिझ यांनी सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्यावर खशोग्गी यांच्या हत्येचा आदेश दिल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी तिने तक्रारही दाखल केली आहे. 2 ऑक्टोबर, 2018 रोजी इस्तंबूलमधील सौदी राजदूत कार्यालयाच्या भेटीदरम्यान सौदी एजंट्सच्या पथकाने जमाल खशोग्गी या सुप्रसिद्ध पत्रकारची हत्या केली होती, असे बोलले जाते. सेनगिझ यांच्याशी लग्न करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे मिळवण्यासाठी ते राजदूत कार्यालयात गेले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details