काबूल (अफगाणिस्तान) - काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर गुरुवारी दुहेरी आत्मघातकी बॉम्बस्फोट झाले, जिथे अफगाणिस्तानातून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांच्या मोठ्या संख्येने जमाव जमा झाला होता यावेळी येथे आत्मघातकी बॉम्बस्फोब हल्ला झाला आणि यात कमीतकमी 60 अफगाणी आणि 12 अमेरिकन सैनिक मारले गेल्याची माहिती अफगाण आणि अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर हा हल्ला ISIS-K या दहशतवादी संघटनेनी केल्याचे मान्य केले आहे.
रशियन अधिकाऱ्यांने सांगितले आहे की, अफगाणिस्तानातून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांच्या मोठ्या संख्येने जमाव काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावर जमा झाला होता. यावेळी तालिबानींनी दोन आत्मघातकी बॉम्बस्फोट केले आहे. यामुळे या परिसरात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15 जण जखमी झाले आहेत. यामध्ये काही अमेरिकन लष्करी अधिकाऱ्यांसह काही लहान मुलांचाही समावेश आहे.
दरम्यान, काबूल विमानतळ परिसरात अंत्यत गोंधळाचे वातावरण आहे. अद्याप मृतांचा आकडा अस्पष्ट आहे, अशी माहिती अमेरिकेचे सार्वजनिक व्यवहार संरक्षण विभागाचे सहाय्यक यांनी दिली आहे.