तेहरान - ट्रम्प यांच्या मरणाआधी त्यांची शांतता योजना नष्ट होईल, असे मत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी यांनी बुधवारी व्यक्त केले. स्थानिक माध्यमांनी याबाबतची माहिती दिली. मध्यपूर्व आशियाई देशांमध्ये शांतता रहावी म्हणून ट्रम्प यांची महत्त्वाकांक्षी योजना मागील आठवड्यात समोर आणली गेली होती. त्यावर खामेनींनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे.
साधारणपणे तीन वर्षे अभ्यास करून तयार केल्या गेलेल्या या योजनेमध्ये जेरुसलेमला इस्त्रायलची 'अविभाजित' राजधानी घोषित करण्याची तरतूद आहे. जेणेकरून, इतिहासातील सर्वात जास्तवेळ चाललेल्या वादांपैकी एक असलेल्या पॅलेस्टाईन-इस्त्राईल वादावर द्विराज्यीय उपाय दाखवता येईल.