महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

US EMBASSY IN BAGHDAD : बगदादमधील अमेरिकन दूतावासाला लक्ष्य करुन तीन रॉकेट डागले ; इराकी अधिकाऱ्याची माहिती

या वर्षाच्या सुरुवातीपासून इराकमध्ये अमेरिकेच्या दूतावासाला ( US embassy Target ) लक्ष्य करून ड्रोन आणि रॉकेट हल्ल्यांची मालिका सुरू आहे. हे हल्ले अमेरिकेच्या हल्ल्याच्या दुसर्‍या वर्धापन दिनानंतर झाले आहेत ज्यात इराणी जनरल कासिम सुलेमानी ( Iranian General Qasim Suleimani ) आणि इराकी मिलिशिया कमांडर अबू महदी अल-मुहंदीस मारले गेले.

US EMBASSY IN BAGHDAD
US EMBASSY IN BAGHDAD

By

Published : Jan 14, 2022, 12:28 PM IST

बगदाद: बगदादमधील अति सुरक्षित क्षेत्रातील अमेरिकन दूतावासाला (US embassy in baghdad) लक्ष्य करुन गुरुवारी किमान तीन रॉकेट डागण्यात आले ( Three rockets fired us embassy baghdad ). याबाबतची माहिती इराकी सुरक्षा अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, यापैकी दोन रॉकेट दूतावासाच्या जवळपास येवून पडले, तर दुसरे एक रॉकेट जवळच्या निवासी संकुलात असलेल्या शाळेवर पडले.

या वर्षाच्या सुरुवातीपासून इराकमध्ये अमेरिकेच्या उपस्थितीला ( Baghdad US embassy ) लक्ष्य करून ड्रोन आणि रॉकेट हल्ल्यांची मालिका सुरू आहे. हे हल्ले अमेरिकेच्या हल्ल्याच्या दुसर्‍या वर्धापन दिनानंतर ( Second anniversary of the American invasion ) झाले आहेत. ज्यात इराणी जनरल कासिम सुलेमानी आणि इराकी मिलिशिया कमांडर अबू महदी अल-मुहंदीस मारले गेले होते. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली आहे की नाही हे अद्याप समजू शकलेले नाही. याआधी, गेल्या गुरुवारी इराक आणि सीरियामध्ये अमेरिकन सैनिकांना लक्ष्य करून हल्ले करण्यात आले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details