महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

अफगाणिस्तानात सुरक्षा दलाचे कार्यालय बॉम्बने उडवून देण्याचा प्रयत्न

अफगाणिस्तानातील राष्ट्रीय सुरक्षा संचलनालयाचे कार्यालय दहशतवाद्यांनी लक्ष्य केले. राष्ट्रीय सुरक्षा संचलनालयाचे कार्यालय हे देशातील सुरक्षा व्यवस्थेसंदर्भातील महत्त्वाचे कार्यालय आहे. याच भागामध्ये अमेरिका आणि नाटो फौजांचे कार्यालय आहे. अद्याप कोणत्याही दहशतवादी गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली नाही.

terrorist tried to bomb blast

By

Published : Sep 5, 2019, 4:31 PM IST

काबूल- अफगाणिस्तानातील राष्ट्रीय सुरक्षा संचलनालयाच्या कार्यालयावर दहशतवादी हल्ला झाला. महत्त्वाची सरकारी आणि आंतराष्ट्रीय संस्थाची कार्यालये असलेल्या साश दारक भागामध्ये दहशतवाद्यांनी कारचा स्फोट घडवला आहे.

सकाळी १० वाजून १० मिनीटांच्या दरम्यान हा स्फोट झाला. अफगाणिस्तानच्या गृह विभागाच्या प्रवक्त्याने याबाबत माहिती दिली. सुरक्षा चौकीजवळ एका कारमध्ये दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणला. काबूल शहराच्या केंद्रस्थानी हा स्फोट झाला. या हल्ल्यात किती नुकसान झाले याबबातची माहिती अद्याप मिळाली नाही.

राष्ट्रीय सुरक्षा संचलनालयाचे कार्यालय हे देशातील सुरक्षा व्यवस्थेसंदर्भातील महत्त्वाचे कार्यालय आहे. याच भागामध्ये अमेरिका आणि नाटो फौजांचे कार्यालय आहे. अद्याप कोणत्याही दहशतवादी गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली नाही.

हेही वाचा : पंतप्रधान मोदींचा पुतिन यांच्यासह जहाज प्रवास, व्यतीत केला 'क्वालिटी टाईम'

ABOUT THE AUTHOR

...view details