टोकियो- उत्तर जपानच्या फुकुशिमा किनारपट्टीवर बुधवारी रात्री उशिरा ७.३ रिश्टर क्षमतेचा भूकंपाचा धक्का ( earthquake struck off the coast of Japan ) बसला. त्यामुळे त्सुनामीचा इशारा देण्यात ( Japan Tsunami alert ) आला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, बुधवारी रात्री ८.०६ वाजता जपानच्या टोकियोपासून २९७ किमी ईशान्येला ७.१ रिश्टर क्षमतेचा भूकंप झाला. जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याची अद्याप माहिती नाही.
जपानच्या हवामान संस्थेने ( Japan Meteorological Agency ) सांगितले की, भूकंपाचे केंद्र समुद्रसपाटीपासून ६० किलोमीटर (३६ मैल) खाली होते. हा प्रदेश उत्तर जपानचा भाग ( Strong Earhquake in Northern Japan ) आहे. 2011 मध्ये 9.0 रिश्टर क्षमतेचा भूकंपाचा धक्का बसला होता. त्यानंतर आलेल्या त्सुनामीमुळे जपानमध्ये मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे आण्विक आपत्तीदेखील झाली होती.
यामुळे होतो भूकंप
पृथ्वी प्रामुख्याने चार थरांनी बनलेली आहे. आतील गाभा, बाह्य गाभा, आवरण आणि कवच असे चार असतात. कवच आणि वरच्या आवरणाच्या कोरला लिथोस्फीअर म्हणतात. हा 50 किमी जाडीचा थर अनेक विभागांमध्ये विभागलेला आहे. त्याला टेक्टोनिक प्लेट्स म्हणतात. या टेक्टोनिक प्लेट्स त्यांच्या जागी फिरत राहतात. जेव्हा या प्लेट्स खूप हलतात, तेव्हा भूकंप जाणवतो. या दरम्यान एक प्लेट दुसऱ्या प्लेटखाली येते.
भूकंपाच्या तीव्रतेचा अंदाज भूकंपाच्या केंद्रातून बाहेर पडणाऱ्या ऊर्जेच्या लहरींवरून लावला जातो. या लाटा शेकडो किलोमीटरपर्यंत कंपन निर्माण करतात. धरतीमध्ये भेगांमध्ये पडतात. भूकंपाची खोली उथळ असेल, तर त्यातून बाहेर पडणारी ऊर्जा भूपृष्ठाच्या अगदी जवळ असते. त्यामुळे भयंकर विध्वंस होतो. परंतु पृथ्वीच्या खोलीत येणाऱ्या भूकंपांमुळे भूपृष्ठावर फारसे नुकसान होत नाही. जेव्हा समुद्रात भूकंप होतो तेव्हा उंच आणि मजबूत लाटा उद्भवतात. त्याला त्सुनामीदेखील म्हणतात.