महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

मक्का येथील मशिदीच्या 'गेट'ला चारचाकीची धडक, एकास अटक - मक्का मदिना बातमी

सऊदी अरबमध्ये एका व्यक्तीने शुक्रवारी (दि. 30 ऑक्टोबर) रात्री उशीरा भरधाव कार चालवत मक्का मशिदीच्या बाहेरील गेटवर धडक दिली. त्या व्यक्तीला तत्काळ पोलिसांनी अटक केली आहे.

मक्का
मक्का

By

Published : Oct 31, 2020, 4:30 PM IST

दुबई (सौदी अरेबिया) -सऊदी अरबमधील मक्का येथे एका व्यक्तीने शुक्रवारी (दि. 30 ऑक्टोबर) रात्री उशीरा भरधाव कार चालवत मक्का मशिदीच्या बाहेरील गेटवर धडक दिली. त्या व्यक्तीला तत्काळ पोलिसांनी अटक केली आहे.

सौदी प्रेस एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार, रात्री साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला. व्यक्तीने कारने प्रथम बॅरेकेडींगला धडक दिली. त्यानंतरही तो न थांबता आपले वाहन पळवू लागला व मशिदीच्या दक्षिणेकडील गेटला जोराची धडक दिली.

घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कार चालकास अटक केली आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मशीद अनेक दिवस बंद होती. नजीकच्या काळातच मशीद सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा- खशोग्गी यांच्या प्रेयसीने सौदी क्राउन प्रिन्सविरोधात केली फिर्याद दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details