रियाध -कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण जग लढा देत आहे. सर्वसामान्य व्यक्ती असो की कोणी शाही राजघराण्यातील बडी हस्ती कोणीच कोरोनाच्या कचाट्यातून सुटले नाही. सौदी अरेबियातील क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.
सौदी अरेबिया : क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांना दिला कोरोना लसीचा डोस - सौदी अरेबिया कोरोना अपडेट
सौदी अरेबियातील क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. सौदी अरेबियामध्ये सध्या 3 लाख 61 हजार 903 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातच 3 लाख 52 हजार 815 जण कोरोनातून मुक्त झाले आहेत. 6 हजार 168 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
बुधवारी देशाला लसींची पहिली खेप मिळाली. देशातील दीड लाखांहून अधिक लोकांनी मोफत लस मिळविण्यासाठी नोंदणी केली आहे. तीन-चरणांच्या लसीकरण प्रक्रियेमध्ये नागरिक आणि देशातील रहिवासी समाविष्ट आहेत, ज्यांना ही लस घेण्याची इच्छा आहे.
सौदी अरेबियामध्ये सध्या 3 लाख 61 हजार 903 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातच 3 लाख 52 हजार 815 जण कोरोनातून मुक्त झाले आहेत. 6 हजार 168 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यापूर्वी अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि त्यांच्या पत्नी जिल बायडेन यांना फायझर लसीचा डोस देण्यात आला आहे.