महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 9, 2022, 9:57 AM IST

Updated : Mar 9, 2022, 12:08 PM IST

ETV Bharat / international

Russia-Ukraine War LIVE Updates : कोका-कोला आणि पेप्सीने रशियातील सेवा बंद केल्या, युद्धाचे प्रत्येक अपडेट फक्त एका क्लिकवर

रशिया-युक्रेन युद्ध
Russia-Ukraine War LIVE Updates

12:06 March 09

9 बांगलादेशींची युक्रेनमधून सुटका, शेख हसीना यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी (PM of Bangladesh Sheikh Hasina) ‘ऑपरेशन गंगा’ (Operation Ganga) अंतर्गत युक्रेनमधून बांगलादेशच्या ९ नागरिकांची सुटका केल्याबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे आभार मानले आहेत. ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत भारतासह नेपाळी, ट्युनिशियाच्या विद्यार्थ्यांचीही सुटका करण्यात आली आहे.

09:46 March 09

  1. कोका-कोला कंपनीने रशियामधील आपला व्यवसाय स्थगित केला आहे. युक्रेनमधील दुःखद घटनांमुळे बेफिकीर परिणाम सहन करत असलेल्यासोबत आम्ही आहोत, असे कंपनीने म्हटलं.
  2. पेप्सिकोने रशियामधील पेप्सी-कोला आणि इतर जागतिक पेय ब्रँडचे उत्पादन आणि विक्री स्थगित केली आहे
  3. युक्रेनसाठी रशियन बनावटीची लढाऊ विमाने देण्याची पोलंडची ऑफर अमेरिकेने नाकारली आहे.
  4. रशियाने युक्रेनची 61 रुग्णालये नष्ट केली. रशियन सैन्याने इमारती आणि वैद्यकीय उपकरणांचे नुकसान केले आहे, असे युक्रेनचे आरोग्य मंत्री व्हिक्टर ल्याश्को यांनी म्हटलं

09:26 March 09

Russia-Ukraine War LIVE Updates : कोका-कोला आणि पेप्सीने रशियातील सेवा बंद केल्या, युद्धाचे प्रत्येक अपडेट फक्त एका क्लिकवर

कीव -रशियाने युक्रेन विरोधात पुकारलेल्या युद्धामुळे ( Ukraine Russia Conflict ) जगभरात पडसाद उमटले आहेत. आज युद्धाचा 14 वा दिवस आहे. संपूर्ण जगात भीतीचे वातावरण आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे परिस्थिती फार बिकट झाली आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या या हल्ल्याचा आता जगभरातून निषेध करण्यात येत असून, युद्ध थांबावावे अशी मागणी होत आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर युरोपीयन संघातील देशांनी एकत्र येत रशियावर कडक आर्थिक निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्बधांमुळे रशियाची कोंडी होईल असा दावा करण्यात येत आहे.

भारतीय विद्यार्थ्यांवर परिणाम -

रशिया आणि युक्रेन युद्धाचा भारतीय विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम झाला आहे. यांच्यात सुरू असलेल्या युद्धात एका भारतीय विद्यार्थ्याला जीव गमवावा लागला. तर आणखी एक विद्यार्थी कीवमध्ये गोळीबारात जखमी झाला होता. युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी सरकारने ऑपरेशन गंगा हे मिशिन राबवले आहे. याअंतर्गत हजारो विद्यार्थी भारतात आले आहेत.

रशियातील नागरिक पुतीनविरोधात रस्त्यावर -

युक्रेनविरोधात रशियाने पुकारलेल्या युद्धाला खुद्द रशियामधील नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. रशियातील नागरिक पुतीनविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी युक्रेन विरोधातीलयुद्ध बंद करण्याची मागणी केली आहे. नागरिकांनी रस्त्यावर येत निर्देशने केल्याने रशियातील हजारो नागरिकांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. दरम्यान या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रशियामध्ये सोशल मीडियावर देखील बंदी घालण्यात आली आहे. रशियामध्ये फेसबूक बंद करण्यात आले आहे.

युक्रेनचे महत्त्व -

युक्रेन हा भारतासारखाच बहुभाषिक देश असून रशिया आणि युक्रेनियन लोकांचा वंश एकच म्हणजे स्लॉव्ह आहे. मात्र, या देशाचे दोन ठळक भाग आहेत. पश्चिमेकडील भागावर युरोपचा मोठा प्रभाव आहे. तर पूर्वेकडील भागावर रशियाचा प्रभाव आहे. युक्रेन हा युरोप आणि रशिया यांच्या दरम्यान असल्याने दोन्ही तो आपल्या प्रभावाखाली असावा, असे युरोपीय देश आणि रशिया या दोघांनाही वाटते. आर्थिक कारणांबरोबरच सामरिक कारणही तितकेच महत्त्वाचे आहे. आता पुतीन यांनी युद्ध पुकारल्याने हे युरोपातील 1945 नंतरचं सगळ्यात मोठं युद्ध असेल. केवळ युक्रेनची नव्हे तर रशियाचीही या युद्धात मोठी जीवितहानी होत आहे.

हेही वाचा -Russia-Ukraine War LIVE Updates: रशियाच्या नैसर्गिक वायू, तेल आणि इंधनावर बंदी - जो बिडेन यांची घोषणा

Last Updated : Mar 9, 2022, 12:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details