महाराष्ट्र

maharashtra

अमेरिकेशी अण्वस्त्रबंदीच्या चर्चेची गरज नाही - उत्तर कोरियन राजदूत

By

Published : Dec 8, 2019, 8:53 AM IST

'आम्हाला अमेरिकेशी लांबलचक चर्चा करण्याची गरज नाही. तसेच, अण्वस्त्रबंदीचा मुद्दा चर्चेतून याआधीच बाद झाला आहे. अमेरिकेकडून करण्यात आलेली 'शाश्वत आणि भरीव द्विपक्षीय चर्चा' हा केवळ 'वेळकाढूपणा' होता. याला 'अंतर्गत राजकीय अजेंडा' असेच म्हणता येईल, असे उत्तर कोरियाचे राजदूत किम सोंग यांनी म्हटले आहे.

अमेरिकेशी अण्वस्त्रबंदीच्या चर्चेची गरज नाही
अमेरिकेशी अण्वस्त्रबंदीच्या चर्चेची गरज नाही

वॉशिंग्टन - उत्तर कोरियाने अण्वस्त्रबंदी करारावरून अमेरिकेवर निशाणा साधला आहे. अमेरिकेशी अण्वस्त्रबंदीवरील द्विपक्षीय चर्चा म्हणजे हे वेळ वाचवण्याची 'ट्रिक' आणि मोठा 'अंतर्गत राजकीय अजेंडा' होता, असे उत्तर कोरियाचे राजदूत किम सोंग यांनी म्हटले आहे. आता वॉशिंग्टनशी चर्चा करण्यासारखे काहीही राहिले नाही, असेही ते पुढे म्हणाले.

'आम्हाला अमेरिकेशी लांबलचक चर्चा करण्याची गरज नाही. तसेच, अण्वस्त्रबंदीचा मुद्दा चर्चेतून याआधीच बाद झाला आहे,' असे अधिकृत वक्तव्य किम सोंग यांनी जारी केले आहे. तसेच, अमेरिकेकडून करण्यात आलेली 'शाश्वत आणि भरीव द्विपक्षीय चर्चा' हा केवळ 'वेळकाढूपणा' होता. याला 'अंतर्गत राजकीय अजेंडा' असेच म्हणता येईल, असे किम यांनी म्हटल्याचे हिल या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

उत्तर कोरियाने अमेरिकेला अणू करारासंबंधात दृष्टिकोन बदलण्याविषयी बजावले होते. यासाठी त्यांनी अमेरिकेला या वर्षाअखेरीपर्यंतची मुदत दिली होती. मात्र, वर्षाअखेरीची मुदत संपत आल्यानंतरही उत्तर कोरियाच्या दृष्टीने अमेरिकेकडून याविषयी सकारात्मक हालचाल दिसून न आल्याने उत्तर कोरियाने करारातून बाहेर पडत असल्याचे दर्शवले आहे. त्यामुळे हा अणू करार मोडल्यात जमा आहे.

अमेरिका आणि उत्तर कोरियादरम्यानची अणू करारावरील चर्चा थांबवण्यात आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांच्यातील हनोई परिषदेनंतर या करारावरून फेब्रुवारीमध्ये बेबनाव झाला होता. यानंतर प्योंग्यांग येथून अमेरिकेला या वर्षाच्या अखेरीपर्यंत आपला दृष्टीकोन बदलण्याविषयी बजावण्यात आले होते. तसेच, असे न केल्यास आपण 'नवा मार्ग' निवडू असा इशाराही दिला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details