बिश्केक - पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाय सहकारी संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेला किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे उपस्थित आहेत. येथे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानही उपस्थित आहेत. मात्र, दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी हस्तांदोलन केले नाही की, एकमेकांना नजरेला नजरही दिली नाही.
पाक पंतप्रधानांशी हस्तांदोलन? छे..! नजरेला नजरही भिडवली नाही..
मोदींनी तेथे उपस्थित असलेल्या सर्व देशांच्या राष्ट्रप्रमुखांची भेट घेतली. त्यांच्याशी हस्तांदोलन केले. चर्चाही केली. मात्र, रात्रीच्या भोजनावेळी एकत्र आले असतानाही मोदींनी इम्रान यांच्याशी साधे हस्तांदोलनही केले नाही.
पंतप्रधान मोदी आणि इम्रान खान या दोघांची भेट झालेली नाही. तसेच, होणारही नाही. मोदींनी तेथे उपस्थित असलेल्या सर्व देशांच्या राष्ट्रप्रमुखांची भेट घेतली. त्यांच्याशी हस्तांदोलन केले. चर्चाही केली. मात्र, रात्रीच्या भोजनावेळी एकत्र आले असतानाही मोदींनी इम्रान यांच्याशी साधे हस्तांदोलनही केले नाही.
पाकिस्तानने भारतात दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्याचे धोरण न बदलल्याने भाज-पाक दरम्यान तणावपूर्ण परिस्थिती आहे. पाकिस्तानने भारताशी संवाद साधण्याचा प्रस्ताव अनेकदा ठेवला आहे. मात्र, भारताकडून त्यांना 'दहशतवादाला खतपाणी घालणे थांबवल्या'शिवाय कोणतीही चर्चा शक्य नसल्याचे निक्षून बजावण्यात आले आहे.