महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

न्यूझीलंड : ज्वालामुखीच्या उद्रेकात १६ जण ठार - न्यूझीलंडमध्ये मृतांचा आकडा वाढण्याची भीती

न्यूझीलंडमधील व्हाईट आईसलँड येथे झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकात १६ जण ठार झाले. यात १५ न्यूझीलंडच्या आणि एका ऑस्ट्रेलियाच्या नागरिकाचा समावेश आहे. अजूनही काही लोक बेपत्ता असल्याचे पोलिसांनी मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली आहे.

न्यूझीलंड : ज्वालामुखीच्या उद्रेकात १६ जण ठार
न्यूझीलंड : ज्वालामुखीच्या उद्रेकात १६ जण ठार

By

Published : Dec 15, 2019, 3:25 PM IST

वेलिंग्टन -न्यूझीलंडमधील व्हाईट आईसलँड येथे झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकात १६ जण ठार झाले. येथील पोलिसांनी ही माहिती दिली. ९ डिसेंबरला या ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता.

न्यूझीलंड : ज्वालामुखीच्या उद्रेकात १६ जण ठार

'व्हाकारी/व्हाईट आईसलँड येथे झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकात १६ जण ठार झाले. यामध्ये १५ न्यूझीलंडच्या आणि एका ऑस्ट्रेलियाच्या नागरिकाचा समावेश आहे,' अशी माहिती पोलिसांनी दिली.

या ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर सुरुवातीला पोलिसांना येथून ६ मृतदेह मिळाले होते. मृतांचा आकडा आता ६ वरून १६ वर पोहोचला आहे. अजूनही काही लोक बेपत्ता असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय, ३१ जण भाजले गेले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्यापैकी २७ जणांची स्थिती गंभीर आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details