जेरुसलेम : इस्राईलचे माजी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू येत्या काही दिवसांमध्येच पंतप्रधान निवासस्थान सोडणार आहेत. १० जूलैपूर्वी ते सहपरिवार या निवासस्थानातून दुसरीकडे जातील. नेतान्याहू, आणि इस्राईलचे नवे पंतप्रधान नफ्ताली यांनी याबाबत माहिती दिली.
दोन वर्षांमध्ये सलग चौथ्यांदा झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये विदेशमंत्री याईल लापिद आणि पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी एकत्रितपणे सरकार स्थापन केले आहे. यानंतर नेतान्याहू यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. गेल्या आठवड्यातच बेनेट सरकारचा शपथविधीही पार पडला होता. मात्र, तरीही १२ वर्षे पंतप्रधान राहिलेल्या नेतान्याहू यांनी पंतप्रधानांचे निवासस्थान सोडले नाहीये.