बगदाद : इरबिल, इराक येथील अमेरिकन दूतावासावर इराणकडून 12 क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत ( Misiles Fired on US Consulate ). अमेरिकेच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. अमेरिकेच्या संरक्षण अधिकाऱ्याने सांगितले की, इरबिल शहरावरील ही क्षेपणास्त्रे इराणच्या शेजारील देशाकडून डागण्यात आली आहेत. या क्षेपणास्त्र हल्ल्याबाबत इराक आणि अमेरिका या दोन्ही देशांकडून निवेदन जारी करण्यात आले आहे. अन्य एका अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले की, कोणतेही नुकसान झाले नाही. आणि कोणीही जखमी झालेले नाही.
मोठे नुकसान
त्याचवेळी इराकी अधिकाऱ्यांनी सांगितले की, अनेक क्षेपणास्त्रांनी अमेरिकन दूतावासाला लक्ष्य केले आहे. दूतावासाची ही इमारत नवीन असून अलीकडेच येथील कर्मचारी स्थलांतरित झाले आहेत. अमेरिकेच्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, किती क्षेपणास्त्रे डागली गेली आणि त्यापैकी किती जमिनीवर पडली हे अद्याप समजलेले नाही. मध्यरात्रीनंतर ही घटना घडली असून, यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.
प्रकरणाची चौकशी सुरु
क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यामुळे अनेक स्फोट झाले आणि अमेरिकन दूतावासाच्या आवारात मोठी आग लागली. व्हिडिओमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू येत असून, आगही दिसत आहे. इराणकडून ही बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागण्यात आल्याचे एका इराकी अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, अधिकाऱ्याने याप्रकरणी अधिक माहिती दिली नाही. अमेरिकन अधिकाऱ्यांनीही हे क्षेपणास्त्र कोणत्या प्रकारचे आहे याची पुष्टी केलेली नाही. इराकी सरकार आणि कुर्दिश स्थानिक सरकार या प्रकरणाची चौकशी करत असल्याचे अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले.