जेरूसलेम - नुकत्याच झालेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवणुकीमध्ये डोनाल्ड्र ट्रम्प यांना पराभवाचा सामना करावा लागला. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पराभूत केले. हा निकाल ट्रम्प यांच्या जिव्हारी लागला असून त्यांनी मतमोजणीच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. इस्त्राईलने या आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. इस्त्राईलची राजधानी जेरूसलेम महानगरपालिका प्रशासनाने ट्रम्प यांना नोकरी देऊ केली आहे.
'काळजी करू नका, तुम्हाला नोकरी देतो'; जेरूसलेम महानगरपालिकेची डोनाल्ड ट्रम्प यांना ऑफर! - डोनाल्ड ट्रम्प जेरूसलेम महानगरपालिका नोकरी प्रस्ताव
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांचा विजय झाला आहे. त्यांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना पराभूत केले. मात्र, ट्रम्प पराभव स्वीकारण्यास तयार नाहीत. आता इस्त्राईलने या आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे.
विदेशी माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार 'निवडणूक हरलात तर काळजी करू नका. आमच्याकडे कर्मचाऱ्यांच्या अनेक जागा रिक्त आहेत. त्यापैकी एखाद्या पदासाठी नक्कीच तुम्ही पात्र ठराल', असे जेरूसलेम महानगरपालिका प्रशासनाने म्हटले आहे. आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर महानगरपालिका प्रशासनाने ही पोस्ट टाकली आहे. सोबत त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना मेन्शनकरून त्यांच्या नोकर भरतीची लिंक देखील जोडली आहे. काही कालावधीनंतर ही पोस्ट काढून टाकण्यात आली.
ही पोस्ट अनावधानाने टाकण्यात आली होती. पोस्ट झाल्याचे लक्षात येताच ती तत्काळ काढून घेण्यात आली, असे जेरूसलेम महानगरपालिकेच्या प्रवक्त्याने सांगितले. ट्रम्प सरकारने डिसेंबर २०१७मध्ये जेरूसलेमला इस्त्राईलची राजधानी म्हणून मान्यता दिली होती.