टोकियो - कावासकी येथे अज्ञात माथेफिरूने सुऱ्याने भोकसल्याने १६ जखमी झाले. यात ८ लहान मुलांचा समावेश आहे. जपानमधील वृत्त वाहिनीने या वृत्तास दुजोरा दिला आहे. तसेच, या घटनेनंतर २ लहान मुले आणि एक प्रौढ व्यक्ती त्यांचे महत्त्वाचे अवयव नसलेल्या स्थितीत आढळून आले आहेत. नोबोरिटो रेल्वे स्थानकावर ही घटना घडली.
जपान : कावासकी येथे माथेफिरूने सुऱ्याने भोकसल्याने १६ जखमी - injured
हल्ला करणारी व्यक्ती ४० ते ५० वर्षांची असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या व्यक्तीने रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या व्यक्तींना अचानकपणे सुऱ्याने भोकसण्यास सुरुवात केली.
हल्ला करणारी व्यक्ती ४० ते ५० वर्षांची असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या व्यक्तीने रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या व्यक्तींना अचानकपणे सुऱ्याने भोकसण्यास सुरुवात केली. तसेच, या व्यक्तीने स्वतःलाही खांद्याजवळ भोकसून घेतले. पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. रेल्वे स्थानकावर खूप गर्दी असताना ही घटना घडली. या घटनेचे फुटेज स्थानिक वृत्तवाहिन्यांवर दाखविण्यात आले. तसेच, जखमींवर उपचार करण्यासाठी तातडीने टेण्ट उभे करून व्यवस्था करण्यात आली.