जेरुसलेम - इस्रायलच्या लढाऊ विमानांनी शुक्रवारी गाझा पट्टीमध्ये इस्लामिक हमास चळवळीशी संबंधित लष्करी छावण्यांवर हल्ला केला. सुरक्षा सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती मिळाली आहे.
सिन्हुआ या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, इस्रायली लष्कराच्या लढाऊ विमानांनी गाझा पट्टीतील अल कसम प्रशिक्षण शिबिरे आणि इतर ठिकाणांवर क्षेपणास्त्रे डागली. गाझा पट्टीमध्ये हमासची सशस्त्र तुकडी असलेल्या अल कसमची शिबिरे आहेत.
हेही वाचा -अल कायदाची तालिबानशी जवळीक राहणारच - संयुक्त राष्ट्र अधिकारी
हा हवाई हल्ला गुरुवारी रात्री गाझाकडून दक्षिण इस्रायलमध्ये करण्यात आलेल्या रॉकेट हल्ल्याची प्रतिक्रिया होती. या हल्ल्यात इस्रायलने हमासच्या शस्त्रे बनवण्याच्या तळांना लक्ष्य केले. तसेच, हमासच्या भूमिगत पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आल्याचे इस्रायली लष्कराच्या प्रवक्त्याने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, रॉकेट हल्ल्यात कोणीही जखमी झाल्याचे किंवा नुकसान झाले असल्याचे समजलेले नाही. तसेच, आतापर्यंत कोणीही या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
हेही वाचा -पाकिस्तान एफएटीएफच्या 'ग्रे लिस्ट'मधून बाहेर पडण्याची शक्यता नाहीच : अहवाल