महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

इस्रायलचा गाझावर हल्ला, 'हमास'च्या अड्ड्यांवर डागला निशाणा

गाझाकडून इस्रायलवर दोन क्षेपणास्त्रे डागण्यात आली. पण, त्यांना हवेत नष्ट करण्यात यश आले असे इस्रायल सुरक्षा दलाने सांगितले. ही कारवाई अद्याप सुरू असल्याचे सुरक्षा दलाने सांगितले. इस्रायलकडून मंगळवारी इस्लामी जिहादच्या एका सर्वोच्च नेत्याचा खून करण्यात आला होता.

By

Published : Nov 16, 2019, 4:00 PM IST

प्रतिकात्मक छायाचित्र

तेल अविव - इस्रायली सेनेने हमास या दहशतवादी संघटनेच्या अड्ड्यांवर हल्ला केल्याची माहिती इस्रायली सरकारने दिली. गाझाकडून इस्रायलवर दोन क्षेपणास्त्रे डागण्यात आली, असा आरोप त्यांनी केला आहे. या कारवाईत इतर दहशतवादी गटांवर हल्ला केला गेला नाही असे इस्रायलकडून सांगण्यात आले.

गाझाकडून इस्रायलवर दोन क्षेपणास्त्रे डागण्यात आली. पण, त्यांना हवेत नष्ट करण्यात यश आले असे इस्रायल सुरक्षा दलाने सांगितले. ही कारवाई अद्याप सुरू असल्याचे सुरक्षा दलाने सांगितले. इस्रायलकडून मंगळवारी इस्लामी जिहादच्या एका सर्वोच्च नेत्याचा खून करण्यात आला होता.

हेही वाचा -पेट्रोल भाववाढीविरोधाच्या आंदोलनाचा भडका, इराणमध्ये पेट्रोलची तिप्पट दरवाढ

या हल्ल्यानंतर इस्लामी जिहादकडूनही इस्रायलवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामुळे देशाच्या दक्षिण आणि मध्य भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. इस्लामी जिहादकडून इस्रायलवर ४५० क्षेपणास्त्रे डागण्यात आली, असा इस्रायलचा दावा आहे. दोन दिवस चाललेल्या या हल्ल्यात १३४ पॅलेस्टाईनचे नागरिका मारले गेले.

ABOUT THE AUTHOR

...view details