बगदाद - इराकच्या उत्तरी किर्कुक प्रांतातील डाकक या गावात शनिवारी रात्री इसिसच्या अतिरेक्यांनी शियांच्या मस्जिदी जवळ सॉकरच्या मैदानावर 'मोर्टार'ने गोळीबार केला. यात सहा नागरिक ठार झाले असून नऊ जण जखमी झाले आहेत.
इराक: इसिसने केलेल्या 'मोर्टर' हल्ल्यात सहा नागरिक ठार तर नऊ जण जखमी - इराक आणि सिरिया
किर्कुक शहराच्या आग्नेय भागात असलेल्या सॉकरच्या मैदानावर इसिसच्या अतिरेक्यांनी हल्ला केला असून यात सहा नागरिक ठार झालेत तर नऊ जण जखमी झाले आहेत.
किर्कुक शहराच्या आग्नेय भागात असलेल्या सॉकरच्या मैदानावर हा हल्ला झाला आहे. यावेळी काही लोक येथे व्यायाम करत होते. या हल्ल्यात सहा नागरिक ठार झाले असून नऊ जण जखमी झाले आहेत. दरम्यान, जमाव नियंत्रण सैन्याच्या हद्दीतच हा हल्ला झाला हे विशेष. एका पोलीस अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर या हल्याची पुष्टी केली.
एकेकाळी इराक आणि सिरियामध्ये पसरलेल्या इसीसचे आता या राज्यांवर कोणतेही नियंत्रण नाही. तरी देखील इसीस या भागात सतत छोटे-मोठे हल्ले करत असतो. याच साखळीत हा हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे.