काबूल- अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये एका लग्न सोहळ्यादरम्यान रिसेप्शन हॉलमध्ये निमंत्रितांची गर्दी जमली होती. यावेळी भीषण स्फोट झाला. या घटनेत 63 जणांचा मृत्यू झाला. तर 180 हून अधिक जण जखमी झाले. या आत्मघातकी हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने आज रविवारी स्वीकारली.
काबूल येथील लग्नावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्याचा जबाबदारी इस्लामिक स्टेटने स्वीकारली - इस्लामिक स्टेट
अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये एका लग्न सोहळ्यादरम्यान रिसेप्शन हॉलमध्ये निमंत्रितांची गर्दी जमली होती. यावेळी भीषण स्फोट झाला. या घटनेत 63 जणांचा मृत्यू झाला. तर 180 हून अधिक जण जखमी झाले. या आत्मघातकी हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने आज रविवारी स्वीकारली.
काबूल येथील लग्नावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्याचा जबाबदारी इस्लामिक स्टेटने स्विकारली
आयएसने म्हटले आहे की, त्यांच्यातील एकाने काबूलमधील या लग्नात स्वत:ला उडवले, तर इतरांनी सुरक्षा दल, पोलीस येताच पार्क केलेल्या स्फोटकांनी भरलेल्या वाहनाचा स्फोट केला. त्यांनी हे स्टेटमेंट टेलिग्राम या मॅसेंजिंग साईटवरुन दिले आहे.