बगदाद -इराकचे पंतप्रधान अदेल अब्दुल महदी यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. देशभरात सुरू असलेल्या सरकार विरोधी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी संसदेमध्ये आपला राजीनामा दाखल केला.
गेल्या काही महिन्यांपासून इराकची राजधानी बगदाद आणि देशाच्या दक्षिण भागांमध्ये मोठ्या प्रमाणात सरकारविरोधी आंदोलने सुरू होती. १ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या आंदोलनांमध्ये आतापर्यंत ४००हून अधिक नागरिकांचा बळी गेला आहे, तर १५ हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर, आपण राजीनामा देणार असल्याचे इराणच्या पंतप्रधानांनी शुक्रवारीच जाहीर केले होते.