तेहरान - अमेरिकेने शुक्रवारी हवाई स्ट्राईक करत इराणच्या विशेष कुद फोर्सचा नेता आणि प्रमुख कासीम सुलेमानी याचा खात्मा केला. पेंटॅगॉनने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या निर्देशानुसार आपल्या अधिकाऱ्यांच्या संरक्षणार्थ ही कारवाई केल्याचे म्हटले आहे. यानंतर सुलेमानी यांच्या हत्येचा भयंकर सूड घेऊ, अशी प्रतिज्ञा इराणने केली आहे.
'इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनी यांनी सुलेमानी हे हुतात्मा झाले आहेत,' असे खामेनी यांनी म्हटले आहे. सुलेमानी यांना श्रद्धांजली वाहतानाच त्यांच्या हत्येसाठी अमेरिकेचा भयंकर सूड उगवण्यात येईल, अशी शपथ घेत त्यांनी अत्यंत जहाल प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, ३ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटाही जाहीर केला आहे, असे वृत्त अल जझीराने दिले आहे.
हेही वाचा -होय, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनीच दिले सुलेमानीला ठार करण्याचे आदेश - पेंटॅगन