तेहरान -इराणचे अध्यक्ष हसन रूहानी यांनी शुक्रवारी इस्रायलला महत्त्वाचे अणू वैज्ञानिक मोहसिन फखरीजादे यांच्या हत्येसाठी दोषी ठरवले आहे. तसेच, या घटनेमुळे इराणचा आण्विक कार्यक्रम मुळीच थांबणार नाही किंवा धीमा होणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
रूहानी यांनी असेही म्हटले आहे की, मोहसिन फखरीजादे यांच्या हत्येविरोधात इराण प्रत्युत्तर देईल. दरम्यान, फखरीजादे यांना कोणी मारले याची आपणास माहिती नसल्याचे इस्रायलच्या कॅबिनेट मंत्र्यांनी म्हटले आहे. इस्रायलने यापूर्वी या भौतिकशास्त्रज्ञावर गुप्त आण्विक शस्त्रांच्या कार्यक्रमात सामील असल्याचा आरोप केला होता.
हेही वाचा -चिनी संरक्षणमंत्री नेपाळच्या दौर्यावर, काठमांडूत दाखल
फखरीजादे हे इराणचे सर्वांत प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ होते. ते संरक्षण मंत्रालयाच्या संशोधन व नाविन्यपूर्ण संघटनेचे प्रमुख होते. अमेरिका आणि त्याच्या जवळचा मित्रदेश इस्रायलला इराणच्या वाढत्या अणुकार्यक्रमाचा धोका वाटत होता. आता फखरीजादे यांच्या हत्येमुळे या देशांमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे.