सना - जगभर कोरोना विषाणूने हाहाकार माजवला असताना मध्यपुर्वेतील येमेन देशामध्ये बंडखोराविरुद्ध सरकारची कारावाई सुरू होती. मात्र, आता येमेन सरकार शस्त्रसंधी करण्यास तयार झाले आहे. त्यामुळे देशात शांतता प्रस्थापित होईल असे म्हणत भारताने या निर्णयाचे स्वागत केले आहे.
हौती बंडखोरांबरोबर येमेनची शस्त्रसंधी; भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडू निर्णयाचे स्वागत
शस्त्रसंधीने हिंसाचार आणि गोंधळाची स्थिती थांबेल. बंडखोरांशी राजकिय चर्चेने शांतता आणि स्थिरता प्राप्त होईल. तसेच कोरोना विरोधातील लढाई लढण्यासाठी येमेनची जनता सज्ज होईल असे भारतीय परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते श्रीवास्तव यांनी म्हटले आहे.
शस्त्रसंधीने हिंसाचार आणि गोंधळाची स्थिती थांबेल. बंडखोरांशी राजकीय चर्चेने शांतता आणि स्थिरता प्राप्त होईल. तसेच कोरोना विरोधातील लढाई लढण्यासाठी येमेनची जनता सज्ज होईल असे भारतीय परराष्ट्र खात्याचे प्रवक्त श्रीवास्तव यांनी म्हटले आहे. मागील काही वर्षांपासून येमेनमध्ये सरकार विरोधी आंदोलन सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने हौती बंडखोर लष्कराविरोधात लढा देत आहेत.
मात्र, नुकत्याच झालेल्या शस्त्रबंदीमुळे देशामध्ये शांतता प्रस्थापित होईल, अशा सदिच्छा भारताने दिल्या आहेत. येमेन येथील हिंसाचारात मध्यपूर्वेतील इराण आणि सौदी अरेबिया या देशांचाही अप्रत्यक्षरित्या सहभाग आहे.