सना - येमेनमधील इराण-समर्थित हौथी बंडखोरांनी त्यांनी 2020 मध्ये सौदी अरेबियाच्या सीमावर्ती शहरांवर 75 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे उडवल्याचे सांगितले.
या गटातील सैन्य प्रवक्ते याह्या सराय यांनी सोमवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या सैन्याने मागील वर्षात येमेनी शहरांवर सरकारी लष्करी ठिकाणांवर निशाणा साधून आणखी 178 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे उडवली, अशी माहिती सिन्हुआ वृत्तसंस्थेने दिली आहे.
हेही वाचा -येमेनमध्ये सरकारसमर्थक सैन्याने 12 हौथी बंडखोरांना केले ठार
ते म्हणाले की, गेल्या वर्षी बंडखोरांनी 'सौदी अरेबियावर ड्रोनमधून 267 बॉम्ब हल्ले आणि येमेनी शहरांमध्ये येमेनी सरकारवर 180 आणखी ड्रोन हल्ले केले.'
गेल्या वर्षी, सशस्त्र हौथी बंडखोरांनी सौदी अरेबियावर सीमापार ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले तीव्र केले होते. परंतु बहुतेक हल्ले सौदी नेतृत्वाखालील युतीने केलेल्या वक्तव्यांनुसार थांबविण्यात आले.
बंडखोर गटाने गेल्या वर्षी येमेनी सरकारच्या ताब्यात असलेल्या शहरांवर हल्ले तीव्र केले. यात शेकडो लोक ठार आणि जखमी झाले, असे सरकारच्या निवेदनात म्हटले आहे.
हेही वाचा -बैरूत : नवीन वर्षाच्या उत्सवांतील गोळीबारांमुळे तीन विमानांना लागल्या गोळ्या