बगदाद - इराकमध्ये गोळीबार होऊन २५ जण ठार तर, १३० जखमी झाल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. एका बंदूकधारी व्यक्तीने बगदादमध्ये सरकारविरोधी निदर्शने करणाऱ्यांवर गोळीबार केला. शनिवारी ही घटना घडली.
येथे शुक्रवारी संध्याकाळीही अज्ञात बंदूकधाऱ्यांनी अल-खलानी स्क्वेअर येथे सामान्य नागरी वाहनांमधून येऊन अचानकपणे निदर्शकांवर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली होती. हा गोळीबार शनिवारी सकाळपर्यंत सुरू होता, असे वृत्त हिल या वृत्तसंस्थेने दिले आहे.