महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

तुर्कीमध्ये ६.८ रिश्टर स्केल भुकंपांचा धक्का; 14 जणांचा मृत्यू - इलाझीग प्रांत

तुर्कीच्या पूर्व प्रांतामध्ये ६. ८ रिश्टर स्केल क्षमतेचा तीव्र भुकंप झाला. या भुकंपात आत्तापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे.

earthquake hits eastern turkey
तुर्की भुकंप

By

Published : Jan 25, 2020, 10:54 AM IST

अंकारा- तुर्कीच्या पूर्व प्रांतामध्ये ६. ८ रिश्टर स्केल क्षमतेचा तीव्र भुकंप झाला. या भुकंपात आत्तापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. सिरवीस जिल्ह्यामध्ये १० किमी जमीनी खाली या भुकंपाचे केंद्र होते.

आपत्ती निवारण पथके मदतीसाठी दाखल झाले आहे. बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. भुकंपाच्या तीव्र धक्क्याने इमारती कोसळल्याची माहितीही मिळत आहे, असे सरकारी प्रतिनीधीने सांगितले.स्थानिक वेळेनुसार पुर्वेकडील इलाझीग प्रांतामध्ये भूकंप शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास झाला. सिवरिस शहराच्या क्षेत्रामध्ये भुकंपाचे तीव्र धक्के जाणवले. त्यामुळे नागरिक घाबरून घराबाहेर पडले. भूकंपानंतर पुन्हा धक्के जाणवण्याच्या भीतीने लोकांना पडझड झालेल्या भागात जाण्यापासून रोखण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details