दमास्कस- सिरियात निर्वासितांच्या छावणीला आग लागल्याने चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर १८ जण आगीत भाजल्याने गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका बालकाचाही समावेश आहे. देशाच्या ईशान्य भागातील कुर्दिशबहुल प्रांतात ही छावणी आहे.
सिरियात निर्वासितांच्या छावणीला आग, चार जणांचा मृत्यू - निर्वासित छावणीत आग
अल होल असे या निर्वासित कॅम्पचे नाव आहे. सिरियन डेमॉक्रॅटिक फोर्सेस (एसडीएफ) कुर्दिश बंडखोरांकडून ही निर्वासितांची छावणी चालवली जाते.
![सिरियात निर्वासितांच्या छावणीला आग, चार जणांचा मृत्यू FILE PIC](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10810198-161-10810198-1614494739187.jpg)
प्रतिकात्मक छायाचित्र
अल होल असे या निर्वासित कॅम्पचे नाव आहे. सिरियन डेमॉक्रॅटिक फोर्सेस (एसडीएफ) कुर्दिश बंडखोरांकडून ही निर्वासितांची छावणी चालवली जाते. हसाखा प्रांतात ही छावणी असल्याची माहिती स्थानिक वृत्तवाहिनीने दिली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हजारो निर्वासित या छावणीत आश्रयास आहेत. हिंसाचारग्रस्त भागातील हजारो कुटुंबे या भागात राहत आहेत.