महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

'ऑल इज वेल, आमचं लष्कर जगात सर्वोत्कृष्ट, इराणच्या हल्ल्यावर उद्या उत्तर देणार'

इराणने अमेरिकेच्या हवाई तळावर केलेल्या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केले आहे.

डोनाल्ड ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्प

By

Published : Jan 8, 2020, 8:55 AM IST

Updated : Jan 8, 2020, 1:04 PM IST

वॉशिंग्टन डी. सी - इराणने अमेरिकेच्या हवाई तळावर केलेल्या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केले आहे. 'ऑल ईज वेल, इराणने इराकमधील अमेरिकेच्या दोन लष्करी तळावर हल्ला केला आहे, सध्या हल्ल्यात किती नुकसान झालं याची माहिती घेतली जात आहे. आत्तापर्यंत तरी अमेरिकेचं सैन्य जगात सर्वोत्कृष्ट आहे, उद्या सकाळी मी यावर बोलेन', असे ट्विट ट्रम्प यांनी केले आहे.

इराकमधील अल-अस्साद आणि इरबील या अमेरिकेच्या लष्करी तळावर इराणने पुन्हा एकदा हल्ला चढवला आहे. या हल्ल्यानंतर दोन्ही देशातील वाद पेटण्याची शक्यता आहे. दोन्ही देशातील तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन ‌अ‌ॅडमिनीस्ट्रेशनने मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या नागरी विमानांना इराक, इराण आणि पर्शियन गल्फच्या भूप्रदेशावरून उडण्यास बंदी घालण्यात आली आहे. इराणकडून नागरी विमानांना लक्ष्य केले जाऊ शकते, या भीतीने अमेरिकेने हा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने हल्ल्याला प्रत्युत्तर न देण्याची धमकी इराणने दिली आहे. तसेच अमेरिकेने प्रदेशातील सर्व सैन्य काढून घ्यावे, अन्यथा हल्ले सुरूच राहतील, असा इशारा दिला आहे.

Last Updated : Jan 8, 2020, 1:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details