अंकारा - पश्चिम तुर्कीमधील भूकंपातील मृतांचा आकडा 49 लोकांपर्यंत वाढला आहे. तुर्की आपत्ती व आपत्कालीन व्यवस्थापन अध्यक्षांनी (एएफएडी) रविवारी अशी माहिती जाहीर केली. यापूर्वी 43 मृत्यूची नोंद झाली होती.
'ताज्या माहितीनुसार, 49 लोक मरण पावले असून 896 जखमी झाले आहेत,' एएफएडीने एका निवेदनात म्हटले आहे.
तुर्कीच्या एजियन किनारपट्टीवर आणि ग्रीस बेटावरील सामोसच्या उत्तरेकडे शुक्रवारी दुपारच्या सुमारास तीव्र भूकंपाची नोंद झाली. तुर्कीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ती 6.6 इतकी नोंदवली गोली. तर, इतर भूकंपशास्त्र संस्थांनी ती 6.9 असल्याचे सांगितले. या भूकंपामुळे तुर्कीमधील तिसर्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या इझमिरमधील इमारती पडल्या आणि सेफेरिहिसार जिल्ह्यात आणि ग्रीक बेटांवर त्सुनामी आली. त्यानंतर शेकडो कमी तीव्रतेचे भूकंपाचे धक्केही बसले.