काबूल (अफगाणिस्तान) - तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर तेथील अनेक व्हिडिओ समोर येत आहे. तालिबानी अत्याचार करतील या भीतीने येथील नागरीक पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, काबूल विमानतळावरचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओची अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.
Viral Video : अफगाणिस्तानातून निघण्यासाठी नागरिकांची काबूल विमानतळावर पुन्हा गर्दी - काबूल विमानतळ व्हिडीओ
काबूल विमानतळवर नागरिकांनी पुन्हा गर्दी केली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अफगाणिस्तानातून निघण्यासाठी नागरिकांची काबूल विमानतळावर पून्हा गर्दी
तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता हस्तगत केल्यानंतर तेथील परिस्थिती बदलली आहे. जीवाच्या भीतीने अफगाणिस्तानचे नागरिक देश सोडून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, युद्धग्रस्त अफगाणिस्तानात पूर्णपणे तालिबानचे वर्चस्व मिळविले आहे.