बिजींग (चीन) : कुनमिंगहून ग्वांगझूला 133 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या चायना इस्टर्न एअरलाइन्सच्या विमानाचा गुआंग्शी प्रदेशात अपघात झाला आहे. विमान डोंगरावर कोसळले आणि त्याठिकाणी आग लागलेली आहे. अपघात झालेले जेट हे बोईंग 737 विमान होते. अद्याप मृतांची संख्या त्वरित कळू शकली नाही असे एका वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.
विमान कोसळेल्या ठिकाणी आग -
चायना इस्टर्न एअरलाइन्सच्या विमानाचा अपघात झाला आहे. या विमानात 133 प्रवाशी होते. हे विमान कुनमिंगहुन ग्वांगझूला जात होते. विमान डोंगरावर कोसळले असून त्या परिसरात आग लागलेली आहे. अद्याप या घटनेत किती जणांचा मृत्यू झाला आहे, याची माहिती मिळालेली नाही आहे.
कोसळलेल्या बोइंग 737 विमानाबद्दल माहिती -
ट्विन-इंजिन, सिंगल आयल बोइंग 737 हे लहान आणि मध्यम पल्ल्याच्या उड्डाणांसाठी जगातील सर्वात लोकप्रिय विमानांपैकी एक आहे. 737 चा कोणता प्रकार अपघातात सामील होता हे त्वरित स्पष्ट झालेले नाही. चायना इस्टर्न 737-800 आणि 737 मॅक्ससह सामान्य विमानांच्या अनेक आवृत्त्या चालवते. 737 मॅक्स आवृत्ती दोन जीवघेण्या क्रॅशनंतर जगभरात बंद करण्यात आले होते. चीनच्या एव्हिएशन रेग्युलेटरने ते विमान गेल्या वर्षीच्या अखेरीस सेवेत परत येण्यास मंजुरी दिली, ज्यामुळे देश असे करणारी शेवटची मोठी बाजारपेठ बनली. चायना इस्टर्न हे चीनच्या तीन प्रमुख हवाई वाहकांपैकी एक आहे.
हेही वाचा -Malik has no bail: 4 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी, नवाब मलिकांचा जेलमधील मुक्काम वाढला,