जेरुसलेम - इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेत्यान्याहू यांनी इस्त्रायली जनतेला भारतीय पद्धतीने नमस्कार करण्याचे आवाहन केले आहे. कोरोना विषाणूने घातलेल्या थैमानाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जनतेला नमस्कार म्हणण्याचा सुरक्षित उपाय सुचवला आहे.
कोरोना सध्या जागतिक पातळीवर असलेला सर्वात मोठा धोका आहे. इस्त्रायल सरकारने घातक कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सुरक्षेचे अनेक उपाय सुचवले आहेत. संशयितांना लोकांपासून एकांतात ठेवण्याची सुविधा करण्यात आली आहे. त्यांना तेथेच उपचाराच्या सर्वोत्तम सुविधा पुरवल्या जात आहेत, अशी माहिती नेत्यान्याहू यांनी दिली.