बगदाद - इराकमधील बगदाद येथे पुन्हा एकदा हवाई हल्ला झाला आहे. उत्तर बगदादध्ये भारतीय वेळेनुसार शनिवारी पहाटे इराकी बिगरलष्करी सशस्त्र गटाच्या (मिलिशिया) ताफ्याला लक्ष्य करण्यात आले. या कारवाईत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. हा इराकमधील इराण समर्थक लढवय्यांचा गट आहे.
हेही वाचा -अमेरिकेचा बगदाद विमानतळावर हवाई स्ट्राईक; इराणच्या कुदस फोर्सचा म्होरक्या कासीम सुलेमानी ठार
इराकमधील शिया मुस्लिमांचा पॉप्युलर मॉबिलायझेशन फोर्सच्या (PMF - सामान्य नागरिकांची जमवाजमव करून तयार केलेले बिगरलष्करी सशस्त्र गट) वाहनाला लक्ष्य करण्यात आले. बगदादच्या उत्तरेकडील ताजी जिल्ह्यात मोठा हल्ला घडवून आणण्यात आला.