काबूल- अफगाणिस्तान सरकारमधील आरोग्य मंत्री फिरोजुद्दीन फिरोज यांनाच कोरोनाची लागण झाली आहे. आज (शुक्रवारी) त्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. देशात आत्तापर्यंत ३ हजार ७०० कोरोनाबाधित आढळून आले असून १०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
अफगाणिस्तानातील आरोग्य मंत्र्याला कोरोनाची लागण; देशभरात ३ हजार ७०० रुग्ण - अफगाणिस्तान कोरोना
अफगाणिस्तान सरकारमधील आरोग्य मंत्री फिरोजुद्दीन फिरोज यांनाच कोरोनाची लागण झाली आहे.
मागील २४ तासांत देशात २१५ नवे कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. अफगाणिस्तान शेजारील इराण देशामध्ये कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे तब्बल २ लाख ७० हजार अफगाणी नागरिक इराणमधून माघारी अफगाणिस्तानात आल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्थलांतर एजन्सीने सांगितले.
माघारी येणाऱ्या नागरिकांची कोणत्याही प्रकारणी चाचणी होत नाही, तसेच नागरिक झुंडीने शहरांमध्ये शिरत आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती निर्माण झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला तर आधीच अनेक दशकांपासून सुरू असलेल्या युद्धामुळे ढासळलेली आरोग्य व्यवस्था आणखी कोलमडून पडण्याची शक्यता आहे.