काबूल - कोरोना विषाणूच्या थैमानाने अफगाणिस्तानातील सुमारे 70 लाख बालके गरीबीच्या खाईत लोटली गेली आहेत. शिक्षण, अन्न अशा मुलभूत गरजांपासून अनेक मुले दुरावली आहेत. देशातली सुमारे निम्मी लोकसंख्या 15 वर्षांच्या खाली असल्याचे मुलांच्या हक्कांसाठी काम करत असलेल्या संघटनांनी म्हटले आहे.
कोरोनामुळे अफगाणिस्तानातील सुमारे 70 लाख बालके मुलभूत हक्कांपासून वंचित - Afghanistan child rights
कोरोनामुळे 70 लाखांपेक्षा जास्त मुलांच्या अन्नावाचून हाल होत आहेत. कोरोनामुळे मागील 3 महिन्यांपासून सर्वजण शिक्षणासारख्या मुलभूत हक्कापासून दुरावले आहेत.
कोरोनामुळे 70 लाखांपेक्षा जास्त मुलांच्या अन्नावाचून हाल होत आहेत. कोरोनामुळे मागील 3 महिन्यांपासून सर्वजण शिक्षणासारख्या मुलभूत हक्कापासून दुरावले आहेत, असे 'सेव्ह द चिल़्ड्रन' संघटनेच्या प्रवक्त्या मरयम अती यांनी म्हटल्याचे स्थानिक माध्यमांनी वृत्त दिले आहे.
अमेरिकेतील जॉन हॉपकिन्सन विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार अफगाणिस्तानात आत्तापर्यंत 15 हजार 750 कोरोनाग्रस्त आढळून आले असून 265 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातातील 60 लाख बालकांचे जीवन धोकादायक बनले आहे, असे कामगार आणि सामाजिक विभाग उपमंत्री गुलाम हैदर जिलानी यांनी युनिसेफच्या आकडेवारीचा हवाला देत सांगितले. यातील 31 लाख बालके अतिशय धोकादायक परिस्थितीत असून 12 लाख बालके काम करणारी आहेत, असे ते म्हणाले.