काबूल -अफगाणिस्तानची राजधानी काबूल शहरात आज(सोमवारी) चार बॉम्बस्फोट झाले. शहरातील ताहीया मस्कान भागात हे स्फोट झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सकाळी ७.४५ ते ९ च्या दरम्यान स्फोट झाले. या हल्ल्याची सविस्तर माहिती हाती आली नाही.
काबूल शहरात चार बॉम्बस्फोट; सुरक्षा मुख्यालय उडवून देण्याचा प्रयत्न - काबूल शहरात बॉम्बस्फोट
देशातील नॅशनल डायरेक्टर ऑफ सिक्युरीटी कार्यालय उडवून देण्याच प्रयत्न दहशतवाद्यांनी केला.
काबूल शहरात बॉम्बस्फोट
देशातील नॅशनल डायरेक्टोरेट ऑफ सिक्युरीटी कार्यालय उडवून देण्याच प्रयत्न दहशतवाद्यांनी केला. रविवारी रात्रीही शहरात दोन ठिकाणी स्फोट झाले. कमबार आणि होटखिल भागात हे स्फोट झाले. यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नसून कोणत्याही गटाने जबाबदारी स्वीकारली नाही.