बैरूत - वाढत्या कोरोना प्रसाराला आळा घालण्यासाठी लेबेनॉनच्या कोविड-19 मंत्रीस्तरीय समितीने 1 फेब्रुवारीपर्यंत 25 दिवसांच्या लॉकडाउन लागू करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. येथे गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
सिन्हुआने दिलेल्या माहितीनुसार, आरोग्यमंत्री हमीद हसन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 'देशातील रुग्णालये कोविड - 19 रुग्णांनी भरले आहेत. महामारीचे संकट चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे.'
सुपरमार्केट आणि केमिस्ट दुकाने वगळता सर्व दुकाने आणि रेस्टॉरंट्स बंद राहतील. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुपरमार्केट आणि मेडिकल स्टोअर्स खुली ठेवण्यास परवानगी आहे.