काबूल :पूर्व अफगाणिस्तानमध्ये शनिवारी तालिबान्यांनी सहा पोलीस अधिकाऱ्यांची हत्या केली होती. त्यानंतर करण्यात आलेल्या हवाई कारवाईमध्ये १३ तालिबान्यांचा मृत्यू झाला आहे. नांगरार प्रांतामध्ये ही एअर स्ट्राईक करण्यात आली.
शुक्रवारी पोलिसांवर केला होता हल्ला..
पूर्व अफगाणिस्तानच्या नांगरहर प्रांतात तालिबानच्या दहशतवाद्यांनी स्थानिक पोलीस कमांडरसह सहा पोलीस अधिकाऱ्यांची हत्या केल्याची माहिती स्थानिक सूत्रांनी स्पुटनिकला शनिवारी दिली. शुक्रवारी, नांगरार प्रांतातील बाटीकोट जिल्ह्यात तालिबान्यांनी स्थानिक पोलीस दलावर हल्ला चढवला. संध्याकाळपर्यंत हा संघर्ष सुरू होता.
तालिबानी म्होरक्याचाही खात्मा..
सोमवारी केलेल्या कारवाईमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये एका तालिबानी म्होरक्याचाही समावेश होता. अमेरिका शांतता करारामध्ये या म्होरक्याची सुटका करण्यात आली होती. अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा संचलनालयाने याबाबत माहिती दिली.
गेल्या वर्षी झाला होता शांतता करार..
२०२०च्या फेब्रुवारीमध्ये तालिबान आणि अफगाण सरकारमध्ये शांतता करार करण्यात आला होता. अमेरिकेने याबाबत दोन्ही पक्षांमध्ये मध्यस्ती केली होती. या करारानुसार, अमेरिकेतील सैन्य मायदेशी परत जाणार होते, तसेच पाच हजार तालिबानी कैद्यांची सुटका करण्यात येणार होती. ज्याच्या बदल्यात, तालिबानकडून एक हजार कैद्यांची सुटका करण्यात आली होती.
हेही वाचा :बलुचिस्तानात 11 कोळसा खाणकामगारांचे अपहरण, गोळ्या घालून केले ठार